चेल्लिंग फेन्सिंग, दोन वाघांचे अन्यत्र स्थलांतरण करा
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:-वाढती भीती, शेतजमिनींवर वाघांचे नियमित दर्शन आणि शासनाकडून अपुऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे जनतेचा संताप वाढत आहे... महाराष्ट्रात वाघांची संख्या देशात चौथ्या क्रमांकावर असून, राज्यातील वन्यजीव संरक्षण क्षेत्रांत विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्प सारख्या अभयारण्यात वाघांची घनता वाढत आहे... जंगल भागाला लागून असलेल्या शेत शिवारात वाघाने आणि बिबटयाने अनेक हल्ले केल्याच्या घटना देवलापार या आदिवासीबहुल भागातील गावांमध्ये सातत्याने घडत आहेत... यावर राजकीय पक्षाच्या पद अधिकाऱ्यांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला... त्वरित उपाययोजनांसह काही वाघांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची मागणी वनविभागाकडे केली... रामटेक तालुक्यातील व्याघ्रहल्ल्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून मागील दोन वर्षांत तब्बल पंधरा व्याघ्रबळी मूळे जीव गमवावा लागला आहे... यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून उपाययोजनेऐवजी फक्त कात्थ्याकुटच सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे... देवलापार भागातील गावांमध्ये सातत्याने घटना घडत आहेत... मृतकांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे... विरोधात कृती झाल्यास वन विभाग गुन्हे नोंद करतो... मग हल्ल्यात झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? यावर संतप व्यक्त करीत काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेचा रोष अनावर होण्यापुर्वी वनविभागाने उपाययोजना कराव्यात... मौदी-सीतापूर भागात एक व झिंजेरिया भागात एक नरभक्षी वाघ आहे... वनविभागाने दोन्ही वाघांचे अन्य ठिकणी स्थलांतर करावे, अशी मागणी माजी पं. स. सभापती संजय नेवारे यांनी केली आहे... वनविभागाने सुरक्षेसाठी शेतशिवार लागदच्या जंगल भागाला तारेचे कुंपण करावे... संबंधित समित्यांच्या माध्यमातून तारेच्या कुंपणासाठी सहकार्य करायला हवे, असे माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते म्हणाले...
जंगल भागाला 'चेल्लिंग फेन्सिंग करावी
बोथिया पालोराच्या सरपंच छाया रोशन भट्टी यांनी काटेरी तारेचे कुंपण तोडले जावू शकते... ते टाळण्याठी जंगल भागाला 'चेल्लिंग फेन्सिंग' करावी... रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढावे, असे मत व्यक्त केले... राज्यमंत्री जयस्वाल व पालकमंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील सदस्याला वनविभागात नोकरी मिळणार आहे... याबाबत दोन्ही मंत्र्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले... तर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कृष्णा भाल यांनी वनविभागाने शेताभोवती काटेरी तारेचे कुंपण लावण्यासाठी ९० टक्के अनुदानावर हेक्टरी एक लक्ष रुपये अनुदान द्यावे, असे मत प्रस्तूत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले...
