महाराष्ट्र वेदभुमी

स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांचा सन-२०२६ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा...

पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठिक ५ वा.स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड येथील सभागृहात रायगड जिल्हा खासदार सुनिल तटकरे यांचे आगमन होताच सर्वच उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले...

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड मंडळाचे अध्यक्ष श्री दगडू बामुगडे यांच्या हस्ते खासदार तटकरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला... यावेळी जेष्ठ नागरिक मंडळाचे सर्वच पदाधिकारी व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते...

या सर्वांच्याच उपस्थित खासदार तटकरे यांच्या हस्ते हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रकाशित होऊन संपन्न झाला...

Post a Comment

Previous Post Next Post