राहुल पाटील यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.
उरण, दि. १७ (विठ्ठल ममताबादे) : उरण नगरपरिषदेच्या माॅं साहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात गेल्या दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासिका सुरु करण्यात आली... या अभ्यासिकेमध्ये दररोज अनेक विद्यार्थ्यां अभ्यास करण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री पर्यंत सलग १०-१२ तास अभ्यास करण्यासाठी बसत आहेत... अनेक वेळा विद्यूतप्रवाह खंडीत होतो परंतू तरीही त्या परिस्थितीवर मोबाईलच्या टाॅर्चच्या लाईटने मात करून विद्यार्थी अभ्यास करत असतात हे सर्वश्रूत आहे... विविध परिक्षांमध्ये यापूर्वी विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे... आताच लागलेल्या एमपीएससी परिक्षेमध्ये माजी सैनिक राहूल पाटील यांनी यश मिळविले आहे... राहूल पाटील यांचे कर निरिक्षक या पदाकरिता निवड झाल्याबद्दल ग्रंथपाल संतोष पवार, सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज, ॲड निरंतर सावंत आणि सर्व विद्यार्थी यांनी पुष्पगुच्छ आणि सुधाकर पाटील लिखीत झुंज क्रांतीवीरांचे हे पुस्तक देऊन सन्मानित केले.यावेळी राहूल पाटील यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले... राहुल पाटील यांनी सदर परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी बेलापूर/नेरुळ या ठिकाणी असलेल्या लायब्ररीमध्ये जाण्या येण्यामध्ये खूप वेळ वाया जात होता... त्यावेळी त्यांच्या मित्रांनी उरणमधील माॅं साहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयाचे नाव सुचवले... तेव्हापासून ते अखंडीतपणे उरणमध्ये माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात(ग्रंथालयात) अभ्यास करायला जात आहेत. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी माॅं साहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयाला दिले आहे ग्रंथालय हे माझ्यासाठी मंदिर आहे त्याच प्रमाणे ही सेवा उरण मध्ये पूर्ण दिवस अभ्यासासाठी उपलब्ध असलेली हि एकमेव सेवा आहे असे मत नम्रपणे राहुल पाटील यांनी व्यक्त केले आहे... या संधीचा फायदा उरण मधील विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे... त्याचप्रमाणे उरण नगरपरिषदेने हि सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उरण नगरपरिषदेचे कर्मचारी आणि आमचे ग्रंथालयातील ग्रंथपाल संतोष पवार, सहकारी कर्मचारी जयेश वत्सराज आणि ॲड. निरंतर सावंत तसेच सर्व सहकारी विद्यार्थी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले...
