उरण दि १७(विठ्ठल ममताबादे): दि. १६ डिसेंबर, २०२५ रोजी उरण तालुक्यातील कळंबूसरे ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये शिक्षण खात्यात मोलाचे योगदान दिलेले माजी मुख्याध्यापक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडी कळंबुसरे ग्रामपंचायत सदस्य, गेली १५ वर्षे संत रविदास मंडळाचे उरण तालुका अध्यक्ष, अलिबाग-विरार कॉरिडोर संघटना सदस्य, टाकवडखाड शेतकरी सामाजिक संस्थेचे सचिव, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव व रायगड जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असणारे गजानन रामदास गायकवाड गुरुजी यांची कळंबुसरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे...
त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर, उरण तालुका प्रमुख संतोषजी ठाकूर, विभाग प्रमुख अनंता पाटील, उपविभाग प्रमुख प्रकाश हिरामण पाटील, शाखाप्रमुख रमेश बारकू पाटील, उपशाखाप्रमुख पद्माकर नारायण पाटील, उरण तालुका युवासेना चिटणीस जितेंद्र पाटील, कळंबूसरे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच उर्मिला निनाद नाईक, सदस्य प्रशांत पाटील, समीर म्हात्रे, रेश्मा पाटील, सारिक पाटील, सविता नाईक, स्वप्नाली पाटील तसेच माजी सरपंच बेबीताई पाटील, माजी सरपंच अनिता पाटील, हिराचंद्र पाटील, कैलास नाईक, अनंत म्हात्रे तसेच उपस्थित सर्व शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे, कळंबुसरे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी सरपंच रामदास मायाजी जाधव, काँग्रेसचे युवा सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भालचंद्र पाटील तसेच आघाडीतील सर्व कार्यकर्ते व उपस्थित कळंबूसरे ग्रामस्थ यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे... योग्य व अनुभवी व्यक्तीची उपसरपंच पदी निवड झाल्याने गजानन गायकवाड यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...
