सुदर्शन दत्तात्रय सावंत यांची सर्वानुमते निवड
अलिबाग : अलिबाग तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा आज डिसेंबर दि. १५ पार पडली... या सभेस तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते... सभेदरम्यान सविस्तर विचारविनिमय झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी सुदर्शन दत्तात्रय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली...
मागील सहा महिन्यांपासून रिक्त असलेले अलिबाग तालुका तलाठी–मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्षपद आज अधिकृतपणे भरले गेले... नवीन अध्यक्षांच्या निवडीमुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध अडचणी, समस्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यास गती मिळणार असून संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली...
