मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील) : वाहतूक नियंत्रण अधिसूचना कळवा वाहतूक विभागाचे हद्दीत महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग महामंडळ यांच्या नियंत्रणाखाली रचना कंट्रक्शन कंपनी यांचे कडून वडपे ते ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील खारीगाव येथील भुयारी मार्गाचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून दिनांक 15/ 12 /2025 रोजी असून मुंबई नाशिक वाहिनीवरील काम करण्यात येणार आहे... सदर परिसरात वाहतूक होऊ देऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत बसून निश्चित राहणे आम जनतेच्या सोयीसाठी आवश्यक आहे... महाराष्ट्र शासन गृह विभाग क्रमांक एम व्ही ए, ११६ सीआर,37 डी आर दिनांक 27 /9/ 1996 चे अधी सूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम 115,116,1 अ)(ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुढील प्रमाणे अधिसूचना जारी करीत आहोत पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर पंकज शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली...
प्रवेश बंद -1) मुंबई नाशिक महामार्ग वरील खारीगाव अंडरपास मधून खारीगाव कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खारीगाव अंडरपास येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे... 2) सदरची वाहने खारेगाव बंद टोल नाका येथून डावीकडे वळण घेऊन ग्यामन_ पारशी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. 3) सदर वाहने साकेत कट डाव्या वळून घेऊन साकेत कॉम्प्लेक्स पुढे किक नाका मार्गे इच्छित स्थळी जातील...
पर्यायी मार्ग : सदर वाहने खारीगाव_ पारशिक सर्कल - ग्यामान सर्कल _खारीगाव बंद टोल नाका येथून पुढे इच्छित स्थळी जातील तसेच ठाणे शहराकडे जाणारी वाहने खारीगाव कळवा नाका येथून पुढे इच्छित स्थळी जातील... सदर वाहतूक अधिसूचना दि: 15 /12 /25 रोजी दुपारी 12:00 ते दि: 9/ 4 /2026 रोजी रात्री 24 :00 वाजे पावेतो 24 तास अमलात राहील सदर वाहतूक अधिसूचक पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस व्हॅन व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनास लागू राहणार नाही... पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांचेकडून प्रसारित करण्यात आली आहे तरी नागरिकांनी दिलेली नियमावली पाळावी ही नम्र विनंती...
