महाराष्ट्र वेदभुमी

रोहा प्रेस क्लबच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; 115 दात्यांनी केले रक्तदान

रोहा - प्रतिनिधी :- रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व, प्रेस फोटोग्राफर कै. जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै जनार्दन शेडगे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 115 पिशव्या रक्त जमा करण्यात आले... कै जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकवेळा रक्तदान करून रूग्णांचे प्राण वाचवले होते... ती भावना कायम ठेवण्याच्या उद्देशाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने गेली 23 वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे...

शिबिराच्या प्रारंभी कै जनार्दन शेडगे यांना मंडळाचे अध्यक्ष अरूण करंबे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली... या शिबिरास मंत्री अदिती तटकरे, विजयराव मोरे, विनोद पाशीलकर, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, रोशन चाफेकर, वनश्री शेडगे आदिं मान्यवरांसह औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे व्यवस्थापक, रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी भेट दिली... या शिबिरासाठी जिल्हा प्रेस क्लबचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष सुहास खरीवले, परिषद प्रतिनिधी शशिकांत मोरे, सरचिटणीस विश्वजित लुमण, सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव, सिद्धेश ममाले, महेंद्र मोरे, संदीप सरफळे, रविंद्र कान्हेकर, शरद जाधव, दीप वायडेकर, राकेश मोरे, रुपेश बामगुडे, समीधा अष्टीवकर, अंजुम शेटे, निलम सावंत, महेश मोहिते, कल्पेश पवार आदींसह प्रेस क्लब व शेडगे मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले... शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढीचे डाॅ दीपक गोसावी व त्यांच्या टीमने सहकार्य केले... रोहा प्रेस क्लबने रक्तदात्यांचे, सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post