महाराष्ट्र वेदभुमी

रोहयातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची डॉ.जाधव नर्सिंग होम मार्फत आरोग्य तपासणी

रोहा - प्रतिनिधी :- मराठी पत्रकार परिषदेच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त दि.३ डिसें. रोजी राज्यातील जिल्हा आणि तालुकास्तरावर "पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे" आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. रोहयातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या आवाहनाला प्रतिसाद देत येथिल नामांकित डॉ. अशोक जाधव यांच्या नर्सिंग होम मार्फत स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत या आरोग्य मोहिमेत सहभाग घेतला आहे...

वर्धापनदिनाचे औचित्य साधून एकाचदिवशी राज्यभरातील सुमारे बारा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केला असून दरवर्षी ही आरोग्य मोहीम परिषद राज्यभरात राबवित असते, पत्रकार नेहमीच समाजासाठी जगत असतो. अत्यंत धावपळीचे आणि दगदगीचे जीवन जगत असताना पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष होते. हे वास्तव लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने 3 डिसेंबर रोजी राज्यातील तालुका आणि जिल्हा स्तरावर आरोग्य तपासणी शिबिरं घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा संघटक शशिकांत मोरे आणि पदाधिकारी यांनी रोहयातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबिय यांची आरोग्य तपासणी डॉ. जाधव नर्सिंग होम यांच्या सहकार्यातुन करून घेतली. यावेळी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची रक्त तपासणी, एक्स रे, ईसीजी, एचआयव्ही, मधुमेह आदी तपासणी करण्यात आली. याकरीता डॉ. अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलचे डॉ. संदेश शिंदे, डॉ. अनामिका लोहार - गुंड, कमलेश साळवी, नर्स व इतर स्टाफने सहकार्य केले. शिबिरामध्ये रोहा प्रेस क्लब सुहास खरीवले, परिषद प्रतिनिधी शशिकांत मोरे, सरचिटणीस विश्वजित लुमण, संपर्क प्रमुख रविंद्र कान्हेकर, श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे, उद्धव आव्हाड, अल्ताफ चोरढेकर, सागर जैन, जितेंद्र जाधव, शरद जाधव, समीधा अष्टीवकर, विश्वजित लुमण, दिनेश जाधव, अंजुम शेटे, रविना मालुसरे, सिद्देश ममाले, संतोष सातपुते, नंदकुमार बामुगडे, सचिन साळुंखे, सत्यप्रसाद आढाव, दीप वायडेकर, कल्पेश पवार आदींनी सहभाग घेतला, या आरोग्य शिबीरासाठी गेली 13 वर्षे डॉ. अशोक जाधव व त्यांच्या सहकारी स्टाफने दिलेल्या सहकार्याबद्दल रोहा प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष सुहास खरीवले यांनी त्यांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post