महाराष्ट्र वेदभुमी

अपघाताचा थरार! भरधाव कारच्या धडकेत दोन महिला ठार

नागपूर-जबलपूर महामार्गावरील कांद्री शिवारातील घटना 

संतप्त नागरिकांनी केला महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

प्रतिनिधी: सचिन चौरसिया 

रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक ४४ वर भरधाव क्रेटा कारने जबर धडक दिल्याने भीषण अपघात होऊन दोन महिला शेतमजूरांचा जागीच मृत्यू झाला... सदर घटना शनिवार (दि.२२) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली... या घटनेनंतर संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली... मंदा दिलीप उपासे (४९) व प्रमिला राजेश शेंद्रे (४१) राहणार दोघेही कांद्री माईन अशी मृतांची नावे आहेत... मंदा आणि प्रमिला ह्या शेतात काम करण्यासाठी घरून पायी निघाल्या... महामार्गावर चालत असतांना नागपूरकडून जबलपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-०५/ एफजी-४७७६ क्रमांकाच्या भरधाव क्रेटा कारने त्यांना मागून धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघेही हवेत फेकल्या जाऊन खालीपडून जागीच मृत्यू झाला... घटनेनंतर कारचालकाने वाहन खुमारी टोल प्लाझाजवळ सोडून पळ काढला... पोलिसांनी कारवाई करत क्रेटा कार चालक सागर हेमंतदास ठाकूर (२७) सह कुणाल अहुजा (२८) प्रशांत निस्वानी (२७) पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत, गुन्हा दाखल करण्यात आला... दरम्यान दोन्ही  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहेत... पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे...

स्थानिकांचा संताप; महामार्ग अडवून आंदोलन

महामार्गावरील भयावह व हृदयद्रावक घटना पाहुन अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग बंद केला... जवळपास अर्धा ते पाऊन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिकांनी टोल परिसरात उभ्या असलेल्या अपघातग्रस्त वाहनाला आग लावण्याचा प्रयत्न केला; मात्र काही जागरूक नागरिकांनी वेळेतच ती आग विझवली... पोलिस आणि टोल व्यवस्थापनाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले... उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि टोल व्यवस्थापनाने नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली...

स्थानिक नागरिकांनी ठेवल्या प्रमुख मागण्या

महामार्गावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, 

⏩ सर्व्हिस रोडची तातडीने निर्मिती करावी

⏩अनधिकृतपणे तोडण्यात आलेले डिव्हायडर पुनर्स्थापित करावेत 

⏩परिसरातील वादग्रस्त पेट्रोलपंप संचालकावर कारवाई करावी

Post a Comment

Previous Post Next Post