५०० महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती; राष्ट्रवादीच्या ‘खेळ पैठणीचा’ उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव
महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित अदिती महोत्सवात ‘खेळ पैठणीचा’ हा उपक्रम अक्षरशः रंगला . मुंबईतील नालासोपारा (पूर्व) येथील आशीर्वाद हॉलमध्ये श्रीवर्धन मतदारसंघातील महिलांचा जल्लोष, उत्साह आणि एकतेचा सोहळा अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमाला तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील जवळपास ५०० पेक्षा अधिक महिला भगिनींनी हजेरी लावली. पारंपरिक वेशभूषा, पैठणीचा रंग आणि महिलांचा उत्साह या सर्वांनीच वातावरण अधिकच सुंदर बनवले.‘स्त्रीशक्तीचा जागर’ हा कार्यक्रमाचा खरा संदेश ठरला तर तटकरे कुटुंबाचे महिलांना सातत्याने पाठबळ या उपक्रमाला खासदार सुनील तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे मार्गदर्शन व प्रेरणादायी पाठबळ लाभले...
श्रीवर्धन मतदारसंघातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सामाजिक सहभागासाठी तटकरे कुटुंबाने नेहमीच पुढाकार घेतला आहे, अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली...
या सोहळ्यात पारंपरिक खेळांच्या माध्यमातून महिलांनी आपली कला, हसरा चेहरा आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दशरथ डांगरे यांनी कौशल्यपूर्ण रीतीने केले. सुरुवात व स्वागत जाधव यांनी, तर प्रास्ताविक संजय कृष्णा माने यांनी केले.आभार प्रदर्शन महेश शिर्के (म्हसळा तालुका अध्यक्ष) यांनी केले...
‘पैठणी क्वीन’ स्पर्धेत तळा तालुक्यातील पाचघर गावच्या शिल्पा सिताराम दळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक म्हसळा तालुक्यातील सिद्धि विनायक रिकामे महिलेला, तर तृतीय क्रमांक तळा तालुक्यातील कासेवाडी गावच्या सुचिता वाझे या भगिनींनी मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे मायक्रो ओव्हन, मिक्सर, इस्त्री, पैठणी साडी आणि नथ देऊन गौरविण्यात आले...
हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळा तालुका आणि श्रीवर्धन मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. जनार्दन शिकवण (मुंबई अध्यक्ष), मोरेश्वर अंधारे (उपाध्यक्ष), संजय माने (युवा सचिव), भाऊ गवाणकर, सुनील जाधव, अनंत राणे, अविनाश राणे, अनंत नाडकर, एकनाथ भोईर, महेश शिर्के (म्हसळा अध्यक्ष), तसेच विश्वनाथ खांडेकर (अध्यक्ष, श्रीवर्धन) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला...
