मुबंई प्रतीनीधी : (सतिश पाटील)
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न न्यायालयात काय घडले?
सरन्यायाधीश गवईप्रतिमा स्रोत, एएनआयप्रतिमा मथळा, काही दिवसांपूर्वी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीशांनी भगवान विष्णूंवर टिप्पणी केली होती.
एक तासापूर्वी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला...न्यायालयात उपस्थित असलेले वकील अनस तनवीर यांनी घटनेची पुष्टी केली.
या घटनेची माहिती देताना अनस तन्वीर म्हणाले, "आज सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही काळ गोंधळ उडाला. यानंतर, बाहेर काढताना, वकिलाने म्हटले - भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही."
अनस तन्वीर म्हणतात की या घटनेदरम्यान न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि त्यांनी सुनावणी सुरू ठेवली.सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर माथेफिरू वकिलातर्फे अपमानास्पद हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर न्यायालयीन चौकशीची मागणी अँड. सुलेखाताई कुंभारे यानी केली आहे.