डॉ. मोकल यांचा यशस्वी जलपर्यटन प्रकल्प....
दापोली( डॉ. प्रशांत परांजपे): दापोली तालुक्यात दाभोळ येथे पहिली अत्याधुनिक आठ रूम असलेली हाऊसबोट सुरू झाली असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले...
दाभोळ येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मंत्री सामंत यांनी कोकणात विकसित करण्यासाठी बॅकवॉटर टुरिझमचे महत्त्व अधोरेखीत केले... तसेच हाऊस बोटीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा आणि सीएमईजीपी योजनेमधून सबसिडी यांचा समावेश करण्यात येईल असेही याप्रसंगी जाहीर केले गेले... त्यामुळे भविष्यात कोकणातील बॅकवॉटर्समध्ये हाऊसबोटी सुरू करणे शक्य आहे असे सांगितले... डॉ. चंद्रकांत मोकल यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे... या बोटीवर आलिशान रूम्स समवेत रुचकर अशा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था ही करण्यात आलीय त्यामुळे सागरी पर्यटनाचा अनोखा आनंद आता पर्यटकांना अनुभवायला मिळणार...
हाऊस बोट उद्घाटन कार्यक्रमाला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पर्यटन व्यवसायिक आणि पर्यटन चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते...
