आपटे-पनवेल(अजय शिवकर): आपटे गावात मयूरदादाशेलार मित्र मंडळ आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात पार पडली...
ही स्पर्धा 19 वर्षाखालील मुलांसाठी होती, यातील सर्व सहभागींमुलांचा सत्कार तर करण्यात आलाच परंतु या उपक्रमातून मुलांना आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव व्हावी, या अपेक्षेने सर्व विद्यार्थ्याला प्रत्येकी एक खास वही देण्यात आली — ज्याच्या मुखपृष्ठावर गडाचे सुंदर चित्र आणि मागील बाजूस त्या गडाची माहिती देण्यात आली आहे...
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले...
आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या प्रत्येक लहानग्या मावळ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले... आपल्या इतिहासाला आणि संस्कृतीला जपणाऱ्या या किल्ले बांधणी स्पर्धेमुळे मयूर दादा शेलार मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे...
