महाराष्ट्र वेदभुमी

शेतात पिककेलं सोनं, परतीच्या पावसाने झोडपलं! बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचे पाट, झोपी गेलेलं सरकारला जाग होईल का?

कोलाड (श्याम लोखंडे) : कोकणात पावसाचा ताळतंत्र बिघडला किती महिने पाऊस याचा अंदाज आता कोणाला येत नाही रायगड कोकण सोडाच तर राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, भात अशा पिकांचे काढणीच्या उंबरठ्यावर असताना पावसाने अक्षरशः तडाखा दिला. रायगडच्या रोहा तालुक्यात काही ठिकाणी वाऱ्या पावसामुळे उभी पिके शेतात आडवी झाली आणि धानाची मोत्यासारखी कणस चिखलात गाढली गेली.कापणी केलेले पीक त्याची करपे पावसात भिजल्याने मोड आले,,साठवलेले धान्य ओलाव्याने नासधूस झाले. शेतात पिकल सोन त्याच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावूनच गेला त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रूंचे पाट वाहू लागले असून शेतकरी वर्ग हताश आणि चिंतेत आहे.सरकारला जाग येईल का नुकसानीत गेलेल्या पिकांचं वेळेत पंचनामे करून भरपाई मिळेल का यावरच बळीराजाचे अक्षरशः डोळे लागले असल्याचे दिसून येत आहे...

एक दोन दिवसांची पावसाची उघडदीप मिळताच बळीराजाने शेतात धान कापणी तर काहीनी झोडणी मळणी सुरू केली त्यात रविवारी पुन्हा दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस बरसल्याने बेलीराज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.रोहा तालुक्यातील कोलाड, खांब, देवकान्हे, धामणसई,भागातील शेतकऱ्यांचे गेली अनेक दिवस परतीचा पाऊस होत असल्याने काढणीला आलेले धानाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेत जमिनीत सोन्यासारख पिकले पिक अक्षरशः चिखलात आडवे पडले आहेत काही पिकांची पूर्णतः नासाडी झाली त्यामुळे भात खरेदी विक्री सोडाच मात्र त्यांच्या कुटुंबांवर उपासमारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.संकटकाळी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्र्यांनी सदरील खात्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यासाठी आदेश दिले आहेत.तर त्या आदेशांचे पालन करत जिल्हाधिकारी,प्रांत, तहसीलदार यांनी त्या खात्यांना सूचना दिल्याने पंचनामे देखील सुरू करण्यात आले असल्याचे समजते शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मात्र त्यात खात्याचे अधिकारी कितपत शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करतात हे पहावे लागणार आहे...

प्रतिक्रिया 

यावर्षी कधी नव्हे तो रायगड जिल्ह्यात में महिन्यात पाऊस आला यात उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे केले मात्र अद्याप त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.तर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, "संपूर्ण हंगामभर पाऊस कुठे पाऊस समाधानकारक तर कुठे कमी झाला. पिक चांगले आले आणि आता पिकं हातात आली तितक्यात परतीच्या सरींत सगळं नुकसानीत जात आहे ." सरकारकडून नुकसानभरपाई जाहीर होईल, अशी अपेक्षा असली तरी अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.दरम्यान, विपक्षाने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत विचारला आहे — "शेतकरी वेदनेत तडफडतोय, पण सरकार मात्र झोपी गेलेय का?"बळीराजाचे डोळे आता नुकसानभरपाई आणि मदतीकडे लागलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बळीराजाला नुसती घोषणा नको तर त्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्याला ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत असून रोहा प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदनातून करण्यात येणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post