प्रतिनिधी आवरे (सचिन पाटिल) : विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हेच शिक्षण क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट होय..आजचा विद्यार्थी हा अभ्यासाबरोबर क्रीडा नैपुण्य मिळविलेला हवा...सदर विद्यार्थी अंतरास्ट्रीय स्तरावर चमकदार व्ह्यायला हवा... यासाठी शिक्षण विभागाच्यातर्फे क्रीडा संकुलन अलिबाग नेहुली येथे भरविण्यात आलेल्या कराटे मार्शल आर्ट्स स्पर्धेत आत्माराम ठाकूर मिशन संचलीत जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडियम स्कूल आवरेचे उज्वल यश तब्बल दहा पदकांची लयलूट केली यात अनुक्रमे दोन सुवर्ण दोन रजत आणि एक कांस्यपदक अशी उज्ज्वल कामगिरी होय सदर खेळाडूंची निवड ही प्रादेशिक स्तरावर झाले आहे.. प्रादेशिक स्तरावर निवड करण्यात आलेले सुवर्णपदक विजेते विद्यार्थी कु शौर्य संदीप म्हात्रे इयत्ता सहावी (१४ वर्षाखालील)जाग्रवी जोमा भोईर 17 वर्षाखालील )तसेच रजत पदक विजेते स्पर्धक 17 वर्षे वयोगट अक्षा उत्तम गावंड इयत्ता नववी कुमारी नुपूर किरण पाटील नववी या सर्व विजेते स्पर्धांकांचे उज्वल यश हे विद्यालयांच्या शिरपेचात मनाचा तुरा रोविला आहे विद्यार्थ्यांनी मिळविलेला यश हे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष अशोक ठाकूर सर यांना दिलेली भावपूर्ण आदरांजली होय.. सर्व विद्यार्थ्यानि म्हटले आहे एखाद्या क्षेत्रात जिंकावे कसं ही ठाकूर सर यांची शिकवण आहे स्वर्गीय ठाकूर सर यांचे आशिर्वाद सदा आमच्या समवेत आहेत...
सदर विद्यार्थ्यांनाने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे क्रीडा व जुडो कराटे मार्शल आर्टस् प्रशिक्षक शिक्षक शुभम ठाकूर सर याचे सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.. विद्यालयाच्या मुख्याद्यापीका सौ निकिता म्हात्रे संस्थेचे विश्वस्त श्री वामन ठाकूर सौ अलका ठाकूर सिंधू ठाकूर प्रसाद ठाकूर प्रतीक ठाकूर आदिनाथ ठाकूर श्रीकांत ठाकूर विद्यार्थ्यांचे पालकवर्ग शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत..
