महाराष्ट्र वेदभुमी

छत्रपतींच्या पराक्रमाला मानाचा मुजरा-उरण मध्ये दिवाळी गडकिल्ले स्पर्धा यशस्वी



दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण-विभाग आयोजित

तालुकास्तरीय दिवाळी गड-किल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२५ यशस्वीरित्या संपन्न

उरण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या या आनंदोत्सवात मुलांच्या मनावर शिवसंस्कार रूजावेत, गड-किल्ल्यांचा अभिमान त्यांच्या अंत:करणात रुजावा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास त्यांच्या हृदयात कोरला जावा, या उद्देशाने दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण-विभाग तर्फे तालुकास्तरीय दिवाळी गड-किल्ले स्पर्धा २०२५ उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली...

गड-किल्ले म्हणजे केवळ दगडांचे बांधकाम नव्हे, तर ते स्वातंत्र्याची शपथ, मराठ्यांच्या शौर्याची तलवार आणि महाराजांच्या अजेय तेजाचे प्रतीक आहेत. सिंहगड, प्रतापगड, तोरणा, रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग या किल्ल्यांमध्ये इतिहासाने क्रांती घडवली आहे. तो इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

   ही स्पर्धा म्हणजे किल्ल्यांची प्रतिकृती तयार करणे नाही…तर किल्ल्यांशी नाते जोडणे आहे! या माध्यमातून स्पर्धकांना शिस्त, एकता, टीमवर्क, नेतृत्व, अडचणींवर मात करण्याची धडाडी हे गुण आत्मसात करता येतात.ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे गड-किल्ले उभे केले, त्या मावळ्यांना मानाचा मुजरा या स्पर्धेमधून देण्यात आला...


स्पर्धेत उरण तालुक्यातील अनेक मावळ्यांनी सहभाग घेतला. परीक्षकांनी स्वतः प्रत्येक गावात जाऊन. किल्ल्यांची सादरीकरण पद्धत, माहिती, बांधकाम कौशल्य यावर आधारित विजेते घोषित केले. त्यानंतर प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित केले. स्पर्धेचे विजेता यादी 

• प्रथम क्रमांक : आई एकविरा ग्रुप वेश्वी – पद्मदुर्ग किल्ला (रोख बक्षीस ₹२०००)

• द्वितीय क्रमांक : जय हरी ग्रुप, बोरी – सिंधुदुर्ग किल्ला (रोख बक्षीस ₹१५००)

• तृतीय क्रमांक : साई अशोक पाटील, वेश्वी – सिंहगड किल्ला (रोख बक्षीस ₹१०००). सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

         या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भावी पिढी स्वराज्याचा कणखर कणा बनण्यासाठी गड-किल्ल्यांचे प्रेरणास्थान ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या स्पर्धेचे यशस्वी आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण-विभागाचे अध्यक्ष राज मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले..

या उपक्रमात मनीष पाटील, चेतन गावंड, गणेश कोळी, शेखर भोमकर, रणिता ठाकूर, आकाश पाटील, समाधान पाटील इत्यादी शिलेदारांनी मोलाचे योगदान देत कार्यक्रम अत्यंत प्रभावीरीत्या पार पाडला...

Post a Comment

Previous Post Next Post