महाराष्ट्र वेदभुमी

शेत कुंपणासाठी शासनाने ९०% अनुदान द्यावे- कृष्णा भाल


वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वाढला हैदोस, पिकांची नासाडी

वर्षाकाठी शेतपिकांचे मोठे नुकसान

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक -: धान पिकाचे क्षेत्र म्हणून रामटेक तालुका प्रसिद्ध आहे येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाचे पीक घेत असतात याकामी मोठी मजूर संख्याही लागत असते एकूणच संबंधीत शेतकऱ्याची मोठी आर्थिक उलाढाल यात होत असते दरम्यान त्याला अस्मानी सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागते मात्र एवढ्यावरच ही संकटे थांबत नाही तर वन्य प्राण्यांचेही एक मोठे संकट शेतकऱ्यांपुढे आ वासुन उभे ठाकत असते. एकीकडे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान करीत असतात तर दुसरीकडे शासनाकडून शेत पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम ही फार तुटपुंजी असते तेव्हा यावर एक प्रभावी उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना शेताभोवती कुंपणासाठी शासनाने किमान ९०% अनुदान द्यावे जेणेकरून वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण होईल अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा देवलापारचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कृष्णा गजानन भाल यांनी शासनाला केली आहे. जंगलाभोवती कुंपण घालणे हे योग्य नाही मात्र जंगलालगतच्या शेतीला कुंपण घालणे तर शक्य आहेना मग त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आज या कृषी प्रधान देशात शेतकऱ्याचे शेतपिकच सुरक्षित नाही तर काय अर्थ राहिला या देशाला कृषीप्रधान देश म्हणजे असे रोखठोक मत कृष्णा भाल यांनी व्यक्त केले आहे. विशेषतः कृषिमंत्री तथा वनमंत्र्यांनी जंगल लगत असलेल्या शेतपरिसराचा आवर्जून दौरा करावा व तेथील परिस्थिती न्याहाळुन पहावी, शेतकरी वर्ग किती संकटांना सामोरे जाऊन या भागात शेती करीत असतो व त्यांचा फायदा किती व तोटा किती याचीही तुलना करावी मग या राज्यकर्त्यांना समजेल की यावर उपाययोजना करणे किती गरजेचे आहे म्हणून असे भाल यांनी राज्यकर्त्यांवर संताप व्यक्त करीत सांगितले. हाती आलेल्या पिकांचे नुकसान म्हणजे तोंडाजवळ आलेला घास हिसकावून नेल्यासारखा शेतकऱ्यांना वाटत असतो हे शेतकऱ्यांशिवाय योग्य तऱ्हेने कोणीही समजू शकत नाही हे तेवढेच खरे आहे तेव्हा शासनाने पुढाकार घेऊन शेताच्या सभोवताल कुंपणासाठी ९०% अनुदान  द्यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा देवलापारचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कृष्णा गजानन भाल यांनी शासनाला केली आहे...

मानव व वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत

आता काही दिवसात शेतकऱ्यांचे शेतपिक जसे की धान पिक कापनीवर येईल, परंतु शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीच्या समस्येला पुढे जाव लागणार आहे त्यात वनविभागाकडून तुटपूंजी नुकसान भरपाई मिळत असते तेव्हा शेतकऱ्यांसाठीची एक मागणी शासनाने मान्य करावी ती म्हणजे अशी की शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर म्हणजे हेक्टरी नव्वद हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती लोखंडी पोल अथवा सिमेंट पोल सहित तार कंपाऊंड करण्याकरिता योजना तय्यार करावी जी योजना शेतकऱ्यांच्या हितार्थ ठरेल आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान होणार नाही आणि मानव व वन्यजीव संघर्ष सुद्धा कमी होईल असे मत कृष्णा भाल यांनी व्यक्त केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post