महाराष्ट्र वेदभुमी

रोहा नगर पालिका निवडणुका पुर्वीच शिवसेनेची जल्लोशात एन्ट्री !

प्रतिनिधी शहानवाज मुकादम/रोहा

रोह्यात मुस्लिम समाजानी धनुष्यबाण हातात घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का- ॲड मनोजकुमार शिंदे ही गल्ली दिल्लीपर्यंत जाते साहेबानी बॅग भरलेली आहे !

घाबरायच काही कारण नाही सगळे रस्ते अलिबागला येतात-आमदार महेंद्र शेठ दळवी...

तुम्ही वचनी राहिले नसतात तर टांगा पलटी घोडे फरार-उसमान भाई रोहेकर...

रोहा बदलतोय, शिवसेना शिंदे गटात असंख्य मुस्लिमांचा प्रवेश,

येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है-अँड मनोजकुमार शिंदे...

रोहा: मोहल्ल्यातील मुस्लिम समाजातील असंख्य महिलावर्ग आणि तरुण मंडळी ने शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने रोह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे...

येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत त्यांना मोठी जबाबदारी   देत एक वेळेस आमच्यावर विश्वास ठेवून बघा रोहा नक्कीच बदलणार,

जसा मुरुड ला दत्तक घेऊन विकास केला त्याप्रमाणे रोहा चाही विकास करणार,-आमदार महेंद्र शेठ दळवी.

सदरच्या पक्ष प्रवेश सोहळ्या साठी तालुका प्रमुख अॅड मनोजकुमार शिंदे, उप तालुका प्रमुख उद्देश वाडकर, अॅड आविनाश भगत, अॅड मयुरा मोरे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वानीच आपल्या  कार्याने रोहा तालुक्यातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे आसणाऱ्या समस्या व विकास कामांवर लक्ष देत सर्व सामान्य नागरिकांची जवलिकता वाढत आसल्याने रोहा मोहल्ल्यातील असंख्य मुस्लिम महिला व तरुण मंडळींकडून शिवसेना शिंदेगटात जाहीर प्रवेश केला आहे...

 या पक्ष प्रवेश सोहळ्यात मा. मंत्री भरत शेठ गोगावले मा. आमदार महेंद्र शेठ दळवी व अन्य मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन ही करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post