महाराष्ट्र वेदभुमी

समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे पोलारीस कंपनीमध्ये कामगार करार संपन्न.

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे): कामगारांना न्याय मिळावा, कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित राहावेत, कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीकोणातून राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले कामगार नेते अतुल भगत यांनी सण २०२२ मध्ये समर्थ जनरल कामगार संघटनेची अधिकृतरित्या स्थापना केली. ही संघटना स्थापन केल्यापासून सदर कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. यातच अनेक ठिकाणी कामगारांच्या पगारात वाढ करण्यात त्यांना वेगवेगळे सेवा सुविधा देण्यात संघटना यशस्वी झाली आहे.उरण तालुक्यातील भेंडखळ येथे पोलारीस कंपनी कार्यरत असून या कंपनी मध्ये समर्थ कामगार जनरल संघटनेची  युनिट कार्यरत असून अतुल भगत यांच्या नेतृत्वात पोलारीस कंपनी मधील हाऊसकिपींग व लेबरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा करार नुकताच संपन्न झाला आहे.पगार वाढीचा निर्णय, करार हा कामगार क्षेत्रात ऐतिहासिक करार ठरला आहे. कामगारांच्या मागणी नुसार हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांसाठी ३९०० रुपये तर लेबर कर्मचाऱ्यांसाठी ४७५० रुपयांची पगारात वाढ झाली आहे. हा पगार वाढ केंद्र शासनाच्या मिनिमम वेजेस नुसार जास्त आहे. त्यामुळे कामगार वर्गांना दिलासा देणारा हा निर्णय असल्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केला आहे.हा करार जेएनपीटी परिसरातील जवळपास १०० हुन अधिक सीएफएस मधील झालेल्या करारपेक्षा जास्त आहे. या कराराचा फायदा भविष्यात उरण मध्ये येणाऱ्या विविध प्रकल्प, सीएफएस मधील कामगारांना मोठया प्रमाणात होणार आहे.असे मत करारा प्रसंगी अतुल भगत यांनी व्यक्त केले.हा करार करताना समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष अतुल भगत, सचिव अजय कृष्णा पाटील, उपाध्यक्ष नैनेश नारायण म्हात्रे तर पोलारीस प्रशासनातर्फे डायरेक्टर संतोषकुमार शेट्टी, डायरेक्टर जेकब थॉमस,पोलारीस लॉजिस्टिक पार्कचे सिईओ कॅप्टन कवीश आनंद,व्हॉइस प्रेसिडेंट एच आर ऍण्ड आय आर अभय वाईकर,एच आर ऍण्ड आय आर हेड हेमंत तेजे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post