महाराष्ट्र वेदभुमी

राज्यात कायदा असूनही पत्रकारांवर हल्ले; पत्रकार संघटनांकडून निवेदन

सचिन चौरसिया रामटेक

रामटेक :- पत्रकारीतेला देशातील लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाते. पत्रकार नेहमीच समाजामधील चुकीच्या गोष्टी लोकांपुढे आणतो. लोकांचे प्रश्न सोडवण्यात मदत करतो. परंतु, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या पत्रकारावर अनेक हल्ले देखील होतात. ज्या प्रमाणात पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे त्या प्रमाणात या कायद्याच्या माध्यमातून संरक्षण मिळत नाही, अशी खंत पत्रकार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर शनिवार (दि.२०) ला गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रामटेकच्या पत्रकारांनी तहसीलदार कार्यालयात व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. या हल्ल्यातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये बातमी संकलनासाठी गेले होते. त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. भविष्यात पत्रकारांवर हल्ले होणार नाहीत, याकरिता सरकारने तत्काळ कठोर पावले उचलावीत, असे ही पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वारंवार होणाऱ्या पत्रकारावरील हल्ल्याबाबत शासन प्रशासन गंभीर नाही. म्हणून व्हाईस ऑफ मीडिया रामटेक तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष राजूजी कापसे यांच्या नेतृत्वात रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे आणि पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तर्फे पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे यांना निवेदन देण्यात आले. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, तसेच या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्या निवेदना मार्फत करण्यात आलेली आहे. यावेळी  व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष राजू कापसे, उपाध्यक्ष रुपेश वनवे, सरचिटणीस पंकज बावनकर, कार्याध्यक्ष रामरतन गजभिये, कार्यवाहक महेंद्र दिवटे, प्रसिद्धी प्रमुख सचिन चौरसिया, सदस्य प्रवीण गिरडकर, प्रशांत येडके आदी सह संघटनेचे अधिकृत पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post