मुंबई प्रतिनीधी :(सतिश पाटील): तिरंदाजीतील 'दुर्गा'..! खांद्यापासून हात नसलेल्या शीतल देवीनं रचला इतिहास; विश्व तिरंदाज स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक....
भारताची १८ वर्षीय तिरंदाज शीतल देवीने शनिवारी दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत शानदार कामगिरी करत विश्वजेतेपद पटकावले... वैयक्तिक तिरंदाज प्रकारात शीतल देवीने तुर्कीयेच्या अव्वल क्रमांकाच्या ओझनूर क्युर गिर्डीचा १४६-१४३ ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले... पॅरा विश्व तिरंदाज जेतेपद स्पर्धेत दोन्ही हात खांद्यापासून नसलेली शीतल देवी ही एकमेव खेळाडू आहे... आपल्या पायांचा आणि हनुवटीचा वापर करून ती धनुष्यातून बाण सोडते...
आज मानवाला सर्व अवयव धडधाकट असून जे साद्य करता येत नाही पण दोन्ही हात नसतानाही ही शितल देवी आज तिरंदाज मध्ये विश्व विजेती ठरते .कौतुकास्पद बाब आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा ! अभिनंदन.