महाराष्ट्र वेदभुमी

वक्तृत्व स्पर्धांसाठी अडीच लाख रुपये देणगी

मुर्ती लहान किर्ती महान!

मुबंई प्रतीनीधी: (सतिश पाटील):भिवंडी तालुक्यातील शिक्षक व एक नाट्य कलाकार  श्री सदानंद गणपत म्हात्रे  यांच्या कन्या कु.संस्कृती सदानंद म्हात्रे व कु.अनन्या सदानंद म्हात्रे या दोघी बहिणींनी गेल्या काही वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मिळवलेली आपली  बक्षिसांची संपूर्ण रक्कम  आणि  "वक्तृत्वाची गुरुकिल्ली" या  त्यांच्या   पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असे एकूण ₹ २,५०,००० (अडीच लाख रुपये)  पाईपलाईन विभागीय विद्या प्रसारक मंडळ टेमघर ता. भिवंडी या संस्थेच्या  ' सुवर्ण महोत्सवी' वर्षानिमित्त संस्थेला देणगी स्वरूपात देण्याचे जाहीर केलेले आहे...

      सदर  दोन लाख पन्नास हजार  रुपयांची रक्कम ही  पाईपलाईन विभागीय विद्या प्रसारक मंडळ  टेमघर, ता भिवंडी या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी  ही रक्कम देणगी स्वरूपात देत असल्याचे श्री. सदानंद म्हात्रे यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post