"रुग्णांना पार्किंग ची गैरसोय"
रेवदंडा पोलीसांकडून दररोज होणारी वाहतूक कोंडी थांबविण्याची मागणी...
प्रतिनिधी शहानवाज मुकादम/रोहा... रेवदंडा : (दि:२९ सप्टेंबर)चौल नाक्यावरील डॉ ओक यांच्या रुग्णालयासमोर रेवदंडा-अलिबाग रस्त्यावर वाट्टेल तशी बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे,..
सदरच्या रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले असल्याने रस्त्यावरुन वाहने जाण्यास आणि चालण्यास जागा राहात नाही...
सदर ठिकाणी डॉ ओक यांचे रुग्णालय आसुन रुग्णालयात येणाऱ्या वाहनांना पार्किंग गैरसोय आसल्याने सदर चे वाहना रस्त्यावर वाट्टेल तशी बेशिस्तपणे उभी करण्यात येते, तसेच तेथील खड्डेमय रस्ता आणि त्यातच रुग्णवाहिका अशा वेळी कोंडी झालेले वाहने हटवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या...
सदर रस्त्यावर कोंडी झाल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे ट्रॉफीक हवालदार श्री किशोर गुरव यांना देताच ते सदर ठिकाणी येऊन नागरिकांच्या सहकार्याने सदरच्या रस्त्यावरील ट्रॉफीक मोकळी करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली...
तसेच सदर रस्त्यावर बेशिस्तपणे उभी आसलेल्या व ज्या वाहनांमुळे रस्त्यावर कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आश्या एकुण ६ वाहनांवर चलन मशिनवर दंड मारुन वाहतूक पोलीसांकडून कारवाई करण्यात आली...
सदर ठिकाणी दररोज बेशिस्तपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग ची गैरसोय आसल्याने संबंधित रुग्णालय कडून पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी आसल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याकडून सदर विषयी योग्य ती कारवाई करून दररोज होणारी वाहतूक कोंडी थांबविण्याची आवश्यकता आहे...