रोहा : रोहयात भल्या पहाटे शेकडो तरुण, महिला भगव्या वेशात दौडले, यावेळी "जय भवानी, जय शिवाजी!" च्या जयघोषाने शहरातील वातावरणात एकतेचं, शक्तीचं आणि राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडवून आणले, सालाबाद प्रमाणे नवरात्रीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित दुर्गादौड उत्साहात पार पडली... धारकरी राजेश काफरे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ११ वर्षे हा उपक्रम सुरू आहे...
भल्या पहाटे सहा वाजता तलवारी व भगवा ध्वज पूजनाने याचे शुभारंभ करण्यात आला. दुर्गा माता मंदिरातून दुर्गादौडला सुरुवात झाली. शेकडो तरुण, महिला भगव्या वेशात सहभागी झाले होते. रोहा शहरातील प्रमुख मार्गांवरून दौड करत श्री धावीर मंदिरात पूजा व दर्शन घेऊन पुन्हा दुर्गा माता मंदिरात सांगता करण्यात आली. यावेळी सहभागी धारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. संपूर्ण दौडभर "जय भवानी, जय शिवाजी!" चा घोष दुमदुमत होता. वातावरणात एकतेचं, शक्तीचं आणि राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडून आल्याचे पहायला मिळाले. यावेळी आपल्या भारता देशाचे हिंदुत्व व अखंडतेचे दर्शन पहायला मिळाले. गेली अकरा वर्षे ही दौड अविरत सुरु असल्याने रोहेकरांनी धारकऱ्यांचे कौतुक केले...
प्रतिक्रिया
ही केवळ एक दौड नव्हे, तर हिंदवी स्वराज्याच्या विचारांची धाव असते, रोहा अष्टमीकर गेली अकरा वर्षे या दुर्गादौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, तरुणांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा प्रज्वलित करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहेया राजेश काफरे, दुर्गादौडीचे प्रमुख धारकरी