महाराष्ट्र वेदभुमी

"थरार, जल्लोष आणि परंपरेचा संगम; नारळ फोडी स्पर्धेत 'लीजेंड्स' मानाचा LEGENDS सन्मान".


अलिबाग (ओमकार नागावकर): नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा-चौल ग्रामस्थ मंडळ आयोजित कै. संजय म्हात्रे स्मृती चषक २०२५ नारळ फोडी स्पर्धा आंग्रेनगर येथे थरारक वातावरणात आणि जल्लोषी जलतरंगात रंगली... कोकणाच्या काठावर वर्षानुवर्षे मान राखणाऱ्या या परंपरागत, प्रतिष्ठित आणि मानाच्या स्पर्धेत नारळफोडी क्षेत्रातील दिग्गज, अनुभवी आणि अपराजित 'लीजेंड्स' यथोचित LEGENDS सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला...

  उत्स्फूर्त प्रेक्षकांच्या घोषणांनी दणाणलेल्या वातावरणात, स्पर्धकांच्या तुफानी खेळीने सामना तापला. स्पर्धा अध्यक्ष संदेश बेडेकर, मुख्य आयोजक व जोशपूर्ण निवेदन करणारे सुहास घोणे, तसेच भारत वाडेकर, आनंद म्हात्रे, केदार मळेकर, सिद्धेश मळेकर, कल्पेश खारकर, प्रथमेश बनिया, आपा मढवी, तेजस शिंदे, मुनाफ गोंडेकर, अजित पाटील, चंद्रकांत धाटावकर, जयवंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं अविस्मरणीय आयोजन पार पडलं... 

   बक्षीस वितरणप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य सुराराम माळी, राजेंद्र नाईक, मुज्जफर मुकादम, संतोष मोरे, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, संदिप खोत, निलेश खोत, जोएल उंदीर, आसिफ गोंडेकर, सलीम गोंडेकर, सचिन पवार, रमेश वार्डे आदी मान्यवरांची भव्य उपस्थिती होती...

       अंतिम क्षणांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अजित असिफ (अलिबाग) यांनी विजेतेपद मिळवले, तर एकविरा (थेरोंडा) यांनी उपविजेतेपद पटकावले. संदेश गायकर (चौल) तिसऱ्या, तर केदार मळेकर (चौल) चौथ्या क्रमांकावर राहिले. मुख्य आयोजक सुहास घोणे यांनी पुढील वर्षी स्पर्धा अधिक भव्य आणि आकर्षक करण्याचा निर्धार व्यक्त केला...

Post a Comment

Previous Post Next Post