महाराष्ट्र वेदभुमी

दुर्गम भागातील विद्यार्थी आजही शैक्षणिक सुविधांत मागास, दानशूर व्यक्तींनी पुढे यावे ; राजेंद्र जाधव

उद्योजक अब्बासशेठ अनवारेंचा मदतीचा हात

 प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा : शहराच्या आजूबाजूची गावे काही पाड्या अशंत: सक्षम असतात. शालेय मुलांना शैक्षणिक सुविधा मिळतात. योग्य मार्गदर्शन मिळते. पण दुर्गम भागातील गावांची स्थिती आजही दयनीय आहे‌ भौतिक, वैद्यकीय मुख्यतः विद्यार्थ्यांना शालेय सुविधा मिळत नाहीत. कोणीच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. फक्त मते मागायला येतात, वाढत्या मुंबई चाकरमानीने अर्ध्याहून अधिक घरे रिकामी आहेत. अशात उरलेल्या आदिवासी, ठाकूर समाजातील मुलेच शाळा, विद्यालयीन शिक्षण घेतात. त्यांना सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. मदतीचा हात द्यावा असे जाणिवेचे आवाहन पत्रकार राजेंद्र जाधव यांनी केले आहे. दरम्यान, दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात मराठी उद्योजक अब्बासशेठ अनवारे हे पुढे सरसावले आहेत. त्यांच्या या प्रभावी कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

               महागांव (तळा) येथील वरदायीनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष नाना खरिवले, नाझ एजन्सीचे राजू डफल, पोलीस पाटील कमळाकर मांगले, पत्रकार शशिकांत मोरे, रवींद्र कान्हेकर, महेंद्र मोरे, उद्धव आव्हाड, माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव, समीधा अष्टीवकर व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रभाकर कोरे सरांनी विद्यालयात मोठ्या संख्येने आदिवासी, ठाकूर समाजातील मुले शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थी पाचसहा किलो. मीटरवरून पायी येतात. दहावीनंतर कोणत्याच शैक्षणिक सुविधा नाहीत. मग शिक्षणावाचून मुलांना थांबावे लागले, ही भयान वास्तवता समोर आणली. पदवी घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यालाही थांबावे लागते. हा प्रसंगच शिक्षकांनी समोर आणला. माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी ही माझी शाळा आहे हि माझ्यासाठी  शाळा नसुन विद्येचे मंदिर आहे येथुनच  याच पवित्र मंदिरातुन सतत चिंतन आणि मनन केल्यामुळे आज सामाजिक कार्य करण्याची  बुद्धी मिळाली तसेच शाळेतील मुलांसाठी अविरत मदत करेन, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची कायम जाणीव ठेवीन, यातून विद्यार्थ्यांना खूप मोठे झाल्याचे मला पहायचे आहे, ही भावुकता जाधव यांनी व्यक्त केली मुख्याध्यापक धनाजी व्यवहारे यांनी माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांच्या सातत्यपूर्ण मदतीचे कौतुक केले. विद्यालयातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील मोठी माणसे झालीत, पण विद्यार्थी भावांची जाणीव ठेवणारा जितेंद्रसारखे कमी आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलेत असे व्यवहारे सरांनी धन्यवाद व्यक्त केले. भाषणात राजेंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुर्गम भागातील विद्यार्थी खूप चपळ, बुद्धीने चलाक असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजेत, कसे पाहावे, कसे बोलावे, चालावे असे सांगत अनेक गमतीशीर किस्से जाधव यांनी सांगितले, मुलांना गाणे, विडंबन सांगून खिळवून ठेवले. मराठी उद्योजक अब्बासशेठ अनवारे यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य दिले, असेच अनेक दानशूर व्यक्ती पुढे यायला हवेत अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post