नवी मुंबई,दि.१९ : काल, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ११ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यामध्ये महिनाभरापूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मनासारख्या पोलिस ठाण्यात वर्णी लागली आहे.
उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांना मुंबईत सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढती मिळाल्याने त्यांच्या रिक्त जागी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हनीफ मुल्यणी यांनी आपसूक उडी घेत जागा पटकावली आहे..
मुलाणी यांनी २००८ मध्ये उरण वाहतूक पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पनवेल तालुका पोलिस ठाणे, गव्हाण फाटा पोलिस ठाणे, वाशी पोलिस ठाणे, गुन्हे शाखेनंतर त्यांनी उरणच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची महत्वाची जागा काबीज केली आहे. त्यांना नवी मुंबई परिसर अवगत आहे... त्यांनी काल दुपारी पदाची सूत्रे स्वीकारली...
त्यांच्या शेजारील न्हावा शेवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी दीपक सूर्वे यांची बदली करण्यात आली आहे. सुर्वे यांची महिनाभरापूर्वी खारघर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून वाहतूक खात्यात बदली करण्यात आली होती. त्यांना न्हावा शेवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सामावून त्यांची मनधरणी करण्यात आली आहे...
