पहाटे जांभिवली गावातील सुलोचना दत्तात्रेय गावडे (वय ६३) या घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधन गृहाकडे जात असताना, अचानक त्यांच्या अंगावर विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत वाहिनी तुटून पडली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा शेजाऱ्यांच्या लक्षात ही घटना आल्यावर त्यांनी आरडाओरड केला. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून वीज प्रवाह बंद केला.
जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पवार, चौक प्रभारी विशाल पवार, पोलिस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे, उप कार्यकारी अभियंता महादेव मुंडे, सहायक वीज अभियंता योगेश देसाई यांना माहिती कळविली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चौक येथे पाठविण्यात आला.
महिलेचा मृत्यू वीज वितरण यांच्या हलगर्जीपणामुळे व वेळीच तारांची दुरुस्ती न केल्यामुळे झाला असा आरोप ग्रामस्थांनी केला असून, योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे....
विशेष बाब म्हणजे ०२ - ०३ खांबांमधील विद्युत वाहिन्यांना आठ-आठ जोड दिले आहेत, त्यामुळे या वाहिन्या आणखी कमजोर झाल्या आहे...
जुनाट जीर्ण झाल्याला विद्युत ६ वाहिनी जोरदार वारा आणि पाऊस यामुळे तुटतात, याची वारंवार तक्रार या परिसरातील जागरूक नागरिकांनी करूनही कार्यवाही न झाल्याने महिलेचा जीव गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे...
