तर कोलाड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गाडी ट्रॅक क्र.एम. एच.४२ ऐ. क्यू.१६२५ वाहन चालक पुगांव ते ऐनवहाळ या मार्गावरून ऐनवहाळ कडे जात असताना हा अपघात घडला.तर मालाने भरलेल्या ट्रक मध्ये माल खाली करणारे हमाल यांना ट्रक मध्ये बसवून जात असतांना ऐनवहाळ गावाच्या हद्दीत आले असता सदर रोड वळणाचा असल्यामुळे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणाने ट्रक उजव्या साईडला नेऊन कच्च्या रोडवर टायर गेल्याने ट्रक चिखलाच्या मातीत खचून हा ट्रक पलटी झाला त्यामुळे ट्रक मध्ये बसलेले हमालांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित चार जन गंभीर जखमी झाले असून त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच साक्षीदार यास देखील लहानमोठी दाखपत झाली तर जितु उर्फ मोदी प्रेमजीत मखवाना अंदाजे वय वर्षे पन्नास याच्या अंगावर ट्रक मधील खचून भरलेल्या रेतीच्या गोणी पडल्यामुळे त्याचा जागीस मृत्यू झाला तर त्याच्या सोबतिचे संतोष शांताराम कोकाटे,प्रफूल गजानन मगर,ज्ञानेश्वर मोरू साळवी,संजय विठोबा चोरगे हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत...
सदर अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी घटना स्थळी भेट दिली.त्यांच्या मार्गदर्शना खाली सह.पोलीस उपनिरीक्षक कदम या घटनेचा अधिक तपास करीत आहेत...
