कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
उरण पूर्व विभागातील आकर्षणाचा केंद्रबिंदू सारडे परिसरातील ऑक्सिजन पार्क ठरला आहे. एका उजाड माळरानाचं रूपांतर हिरवळीत करून हे ऑक्सिजन पार्क फुलवल गेलं आहे.
उरण पूर्व विभागातील सारडे गावातील घोल कोमनादेवी जंगल परिसरात माळरान होते. तिथेच पुढे बायादेवी म्हणजे सातीआसरा यांचं स्थान आहे. आजही नागरिक या परिसरात चप्पल घालून जात नाहीत. अशा या ठिकाणी पुढे सारडे ग्रामस्थांनी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पने खाली धरणाचा बंधारा बांधून एक डॅम बनवला. हा बंधारा बांधल्यानंतर या ठिकाणी डोंगरातून येणार तसेच पावसाचं पाणी साचू लागले व त्याचे रूपांतर एका धरणात झाले. त्यामुळे परिसरातील नागरिक या भागात येऊ लागले. या रखरखाट असणाऱ्या माळरानावर काहीतरी सुंदर फुलवावे ही संकल्पना सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांना सुचली व त्यांनी सोशल मीडियाच्या साह्याने समस्त तरुण मंडळींना अबाल वृद्धांना गोळा केले व आपल्या संकल्पने बद्दल संबंधिताना सांगितले व प्रत्येक व्यक्तीच्या नावे त्यांनी झाडे लावली झाडे जोपासली. गुलाब, तुळस, वड, पिंपळ, उंबर,आंबा, जांभूळ, बदाम, सोनचाफा चाफा, काजू सिताफळ, चिकू, लिली अशी विविध जातींची झाडेही लावण्यात आली. उन्हाळ्यात झाडे सुकू नये म्हणून सारडे विकास मंचच्या माध्यमातून या झाडांना दररोज पाणी देण्यात आले. कित्येकदा वणवा पेटवण्याचा प्रयत्न काही समाजकटकांनी केला. मात्र सारडे विकास मंचाचे सदस्य खचले नाहीत त्यांनी अहोरात्र मेहनत करून ही झाडे जगवली. त्यानंतर हळूहळू हे ऑक्सिजन पार्क उदयाला आले. समाजातील विविध घटकांची मदत घेऊन व स्वखर्चाने सारडे विकास मंचच्या माध्यमातून या पार्कमध्ये विविध गोष्टी आणण्यासाठी सुरवात केली. पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे लहान मुलांना खेळण्यासाठी सी-सॉ, झोपाळे. जोवर ट्रॅक, अशा विविध गोष्टी या ऑक्सिजन पार्क मध्ये बसविण्यात आल्या. त्यानंतर ऑक्सीजन पार्क मधील निर्जीव दगडांना देखील चित्राचे स्वरूप देऊन सजीव करण्यात आले आहे... यामुळे या पार्कच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे...कुणी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या वाढदिवसानिमित्त, आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ या ऑक्सिजन पार्कसाठी देणगी देऊ लागले... खरंतर ऑक्सिजन पार्क हे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं पार्क म्हणायला हरकत नाही. कारण याची बरीचशी काम शासनाची कोणतीही मदत न घेता लोक वर्गणीतून झालेली आहेत. हे या पार्कचे विशेष आकर्षण आहे. आज मुंबई,नवी मुंबई, पनवेल,उरण,परिसरातील कित्येक नागरिक ऑक्सिजन पार्कला भेट देता उरण पूर्व विभागातील हे ऑक्सिजन पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे... सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळते...
नागेंद्र म्हात्रे (अध्यक्ष सारडे विकास मंच) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,डोंगरात असणाऱ्या माळरानावर काहीतरी हिरवळ फुलवावी व हा परिसर आणखी सुंदर करावा, अशी कल्पना मला २०१४ साली सुचली. त्यानंतर हे ऑक्सिजन पार्क फुलवण्यास, मला माझे मित्र मंडळी, नातेवाईक, सहकारी, वरिष्ठ, यांनी खूप साथ दिली. भविष्यात उरण मधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणून, ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे...अशी माझी संकल्पना होती...
