महाराष्ट्र वेदभुमी

मुरुड ठाणे हद्दीत दुसऱ्यांदा चरसचा मोठा साठा जप्त,

संपूर्ण मुरुड तालुक्यात नागरिकांत चिंतेचा विषय ऐरणीवर...

मुरुड पोलिसांची मोठी कामगिरी... 

शहानवाज मुकादम/रोहा

मुरुड:पोलीस ठाणे हद्दीत चरसचा मोठा साठा असल्याची  माहितीदाराकडुन गुप्त माहिती मिळताच मुरुड पोलिसांकडून मोठी कामगिरी करत सदर चा साठा जप्त करुन मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

 दिनांक 31/07/2025 रोजी 17:30 वाजताचे सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, काशीद समुद्रकिनारी येथे संशयास्पद प्लास्टिक गोणी दिसत आहेत, त्याबाबत खात्री करण्याकरिता मुरुड पोलीस कडील अधिकारी व अंमलदार तात्काळ रवाना होऊन खात्री केली असता... सदर ठिकाणी प्लास्टिक गोणी मध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ मिळून आल्याने, त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करून सदर च्या गोणीतील साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन 11.148 कि.ग्रॅम असून एकूण किमंत 55,74,000/- रुपये अशी आहे...

 त्याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं 50/2025 एन.डी.पी.एस कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

 सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आँचल दलाल, मा. अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग श्रीमती प्रतीक्षा खेतमाळीस, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, श्री. मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मुरुड पोलीस ठाणे, पोउनि/ अविनाश पाटील, पोह/जनार्दन गदमले, पोह/हरी मेंगाळ, पोशी/मकरंद पाटील, पोशी/निखील सुर्ते, पोशी/कैलास निमसे, पोशी/संतोष मराडे, पोशी/सुमित उकार्डे यांनी केलेली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post