महाराष्ट्र वेदभुमी

श्रीमती स्मिता नाखवा व सुनिता कडू यांनी ग्रामपंचायत व उरण पोलिस स्टेशनला तक्रार देऊनही आरोपींवर कारवाई नाही

 


कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी

वंचित बहुजन आघाडीने प्रकरण धरले उचलून

उरण,दि.०१ : श्रीमती स्मिता विजय नाखवा या  करंजा नवपाडा, ता. उरण, जि.रायगड  येथे राहत असून त्या विधवा महिला आहेत . त्या त्यांच्या मुलीसह स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्या पतीच्या नावे वारसा म्हणून मिळालेले घर व जमीन  त्यांचे नातेवाईकानी  बळजबरीने बळकावले  असून त्यावर बांधकाम केलेले आहे. सदर प्रकरणाची माहिती व तक्रार ग्रामपंचायत चाणजे व उरण पोलीस स्टेशन मध्ये  श्रीमती स्मिता विजय नाखवा यांनी दिलेली असून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही...

तसचे सोनारी ग्रामपंचायत  मध्ये श्रीमती. सुनिता संजय कडू याच्या वर सुद्धा  ग्रामसेवक अन्याय करीत आहे. म्हणून दिनांक १ ऑगष्ट २०२५ रोजी शुक्रवारी उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री विनोद मिंडे याच्या जवळ वचित बहुजन आघाडीचे सिफरस पत्र दिले व मगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वंचित  बहुजन आघाडी ने हुचलुन धरले असून  राष्ट्रीय अध्यक्ष आयु ॲड.प्रकाश आंबेडकर  तथा बाळासाहेब आंबेडकर व आयु श्री महेश भारतीय राष्ट्रीय खजिनदार वचित बहुजन आघाडी तथा सदस्य सल्लागार समिती सम्यक विद्यार्थी आंदोलन ह्यांनी उरण पंचायत समिती ला वंचित बहुजन आघाडीचे पत्र देऊन स्वःत जातीने लक्ष घालून सर्व प्रशासकीय अधिकारी यांना जाब विचारला व श्रीमती स्मिता विजय नाखवा रा.करंजा नवापाडा याच्यावर ग्रामपंचायत प्रशासन चाणजे व ग्रामसेवक न्याय देत नाहीत  याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा  अशी मागणी केलेली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी उरण तालूकचे संपर्क प्रमूख नेते व उरण तालूक संघटक राष्ट्रीय गौरव पुरस्कार समाज सेवक सत्यशोधक आयु श्री नरेश कोळी अध्यक्ष आयु तुकाराम खंडागळे उपाध्यक्ष आयु तुषार गायकवाड, विधणे जासई विभाग उपाध्यक्ष आयु अशोक वाघमरे.  श्री. गणेश पाटील, सचिन भोईर, श्री रोशन घरत, श्री सोमनाथ म्हात्रे आदी मान्यवर  उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post