कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
मुंबई - दि.०१ : रायगड जिह्ल्यातील उरण तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्या आहेत. त्या सर्व समस्याची कैफियत घेऊन सामाजिक कार्यकर्ते नरेश कोळी हे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन, उरण तालुक्याला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत... त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली... त्यावेळी ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी माझ्यापरीने सरकार दरबारी प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली...
