कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
जे.एन.पी.टी, दि.३१ : दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी कॉ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही उपस्थित होते... त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा. आमदार जयंतभाई पाटील, मा. आमदार मनोहरशेठ भोईर, मा.आमदार बाळूशेठ पाटील, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील उद्योगपती जे.एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, राष्ट्रवादी(श.प) प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, जेएनपीएचे दोन्ही ट्रस्टी- दिनेश पाटील आणि रवि पाटील तसेच कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते - डॉ. डी. एल. कराड, कॉ टी. नरेंद राव यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी सुधाकर पाटील ((Ex IRS) होते... रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणांमध्ये सांगितले भूषण पाटील सर्वांसाठी तळमाळीने काम करणारा कार्यकर्ता असून तो जनतेसाठी अहोरात्र मेहनत करत आहे... त्यामुळे जनता भूषण पाटील यांच्या पाठीशी आहे...
कॉ भूषण पाटील हे अगदी सरळ- साधं व्यक्तिमत्व. जवळ आलिशान गाडी नाही कि बंगला. वावर नेहमी सर्वसामांन्यात. 22 वर्षे जेएनपीटीचे ट्रस्टी राहिले , तेही निष्कलंक. एकनिष्ठ आणि कडवे कम्युनिस्ट.मात्र कामगार, सामाजिक क्षेत्रात सर्व विचारधारासोबत घेऊन आणि सर्वांचा सन्मान आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून काम करायचे, हे स्वागतार्ह तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगिकारले. म्हणूनच त्यांना समाज मान्यता मिळाली आणि या कार्यक्रमास दृष्ट लागावी असा प्रचंड प्रतिसाद लाभला...
उरण-पूर्व विभागात 2006 साली एसईझेडचे संकट आले. त्यावेळी त्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले... 21.06.2006 रोजी कम्युनिस्ट नेते सिताराम येच्युरी यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवनवर पहिला मोर्चा धडकला. त्यात ते अग्रभागी होते. पुढे हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठी कॉ. भूषण यांनी येच्युरीं सोबत यशस्वी पाठपुरावा केला. उरण-पूर्व विभागातीलही आंदोलनात ते सहभागी राहिले...
कॉ भूषण पाटील गौरव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार जगदीश तांडेल यांनी केले... सन्मान पत्राचे वाचन कामगार नेते संतोष पवार यांनी केले... कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रफूल वशेणीकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव समितीच्या सर्व सदस्यांनी अतीशय मेहनत घेतली...
