पारशिवणी येथे पार पडला रानभाजी महोत्सव
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:- शहरी लोकांना आरोग्यदायी रानभाज्याची ओळख व्हावी, म्हणून राज्य शासनाच्या ‘आत्मा’ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागाच्यावतीने ऑगस्टच्या मध्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो... गुरुवार (दि.२१) ऑगस्ट रोजी पारशिवणी मध्ये पंचायत समिती सभागृहात रानभाजी येथे एक दिवसाचा महोत्सवाचे आयोजन केला होते. कार्यक्रमाचे उद्धाटन राज्याचे कृषी राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले... जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आताच्या पिढीलाही या भाज्याची ओळख नाही ती व्हावी म्हणून हा लेख प्रपंच…!! रामटेक व पारशिवनी हा आपला भाग जंगलांनी व्यापलेला असून निसर्गाने अत्यंत समृद्ध आहे. येथे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि उत्तम भाजीपाला उपलब्ध आहे... रानभाज्या या पौष्टिक, आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. महिला बचत गटांना बाजारपेठ मिळावी यासाठी आपण उमेद मॉल उभे करत आहोत... याच धर्तीवर शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी मॉल उभारण्याचेही ठरविले आहे... आजच्या काळात सेंद्रिय शेती आणि रानभाज्यांविषयी सर्वसामान्यांमध्ये आकर्षण आहे आणि ग्राहक त्यासाठी योग्य किंमत देण्यास तयार आहेत, त्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. यावेळी तालुका कृषी अधिकारी राकेश वासु, तहसीलदार वाघचौरे, गटविकास अधिकारी सुभाष जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन निकोसे, माजी सदस्य जिल्हा नियोजन सुधाकर मेंगर, शिवसेना तालुका प्रमुख राजू भोस्कर, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रेम भांडेकर, राजेश गोमकाडे, दिपक शिवरकर, विजय भुते, प्रमोद काकडे, गौरव पनवेलकर राहुल मेंगर, अतुल हजारे, आशिष धोटे, उपस्थित होते...
