महाराष्ट्र वेदभुमी

वीरशैव माहेश्वर मंडळ रायगड जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मणस्वामी जंगम यांची निवड.

कोलाड (श्याम लोखंडे )  रोहा तालुक्यातील लांडर गावचे सुपुत्र तथा गावचे पोलिस पाटील पंचक्रोशी रोहा जंगम समाजाचे कार्यरत अध्यक्ष सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक त्याचबरोबर गेली अनेक वर्षानुवर्ष विधिवत पद्धतीने समाजात पूजा पठण करणारे जंगम समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मस्वामी जंगम यांची रायगड जिल्हा वीरशैव माहेश्वर मंडळाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील झालेल्या बैठकीत निवड करण्यात आले आहे. रायगड जिल्हा वीरशैव माहेश्वर मंडळ यांची माणगाव येथे श्री मामू लक्ष्मण गुरुजी माणगाव यांच्या निवासस्थानी जिल्हास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत जिल्हा अध्यक्ष म्हणून माहेश्वर मूर्ती श्री लक्ष्मणस्वामी जंगम (लांडर रोहा ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे...

धाटाव विभाग तसेच रोहा तालुक्यासह जिल्ह्यात माहेश्वर मूर्ती लक्ष्मणस्वामी जंगम हे पूजापाठ पठणात ओबीसी समाजात व जंगम समाजात लक्ष्मणस्वामी हे मोलाचे कार्य करत आहेत असे समाजसेवक कर्तुत्ववान कार्यतत्पर ओळखले जाणारे लक्ष्मणस्वामी यांची रायगड जिल्हा वीरशैव माहेश्वर मंडळ जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...

तर आयोजित सभेत वीरशैव माहेश्वर मंडळ रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून माहेश्वर मूर्ती लक्ष्मणस्वामी जंगम लांढर रोहा,सरचिटणीस म्हणून माहेश्वर मूर्ती श्री राजेंद्रस्वामी जंगम (खरीवली माणगाव) यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून माहेश्वर मूर्ती श्री प्रणवस्वामी (माणगाव) यांची निवड करण्यात आली... तर आयोजित सभेत त्यांच्या सर्वानुमते निवडीनंतर जंगम समाजाचे पदाधिकारी तसेच समाजानी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post