प्रतिनिधी नंदेश गायकर.. रोहा तालुक्यातील चणेरे शाळा ही नावाजलेली शाळा असून योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन , शिस्तबद्ध अशी शाळा आहे... कारण या शाळेला माननिय अशोकजी कांबळे साहेब यांच्यासारखे होतकरू अध्यक्ष लाभले आहेत... नेहमी शाळेसाठी झटणारे शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, त्याचं आरोग्य सुधारावे म्हणून त्यांच्या संकल्पनेतून माननिय सुनील देशमुख रोहा तालुका आय काँग्रेस अध्यक्ष यांनी चणे रे शाळेसाठी अशोक कांबळे यांच्या शिफारसीला मान देऊन एक वॉटर फिल्टर सस्नेह भेट दिला... अशोक कांबळे यांनी आपल्या शाळेविषयी असलेली बांधिलकी सर्वोत्परी जपली आहे... अशा उदार व्यक्तिमत्व माणसाला जनतेच्या सामाजिक जाणिवेची, शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी असणाऱ्या काळजीवाहू अध्यक्ष या नात्याने योग्य पद दिल्याची जनतेत चर्चा होत आहे..
