मुंबई प्रतीनीधी: (सतिश वि.पाटील): याला जबाबदार कोण रस्त्याचे ,पुलाचे ठेकेदार काय समाजसेवा म्हणून निस्वार्थ व निशुल्क काम करत आहेत का ? जनतेकडून अनेक टॅक्स वसूल करून ही सेवा सुविधांचा अभाव! जनतेने निवडून दिलेले लोक प्रतिनीधी कशा साठी असतात! सरकार ला जाब कोण विचारणार? कामाचा निकृष्ट दर्जा , महीन्यात च रस्त्यावर खड्डे,पुल बनवतानाच कोसळणे,काम पुर्ण करुन देण्याची नियमावली यावर देखरेख कोणाची असते भ्रष्टाचारमुक्त सरकार सत्तेवर आल्यानंतर ही येरे माझ्या मागल्या तो भ्रष्टाचारात अडलेला व्यक्ती कोणीही असो काही फरक पडत नाही तो पक्षात विलीन करून घेतला जातो. ईडी,सिबीआय तर नावाला आहे , अशा प्रत्येकाला पक्षात मंत्रीपद दिल्यावर भ्रष्टाचार मुक्त सरकार कसे बोलू शकता? तो चार पट वाढतच आहे ,मग सर्व स्थरांतून वसूली ही जनतेकडून केली जाते ! आणि जनता मुकाट खिशाला बसलेला फटका सहन करीत आहे, जनतेच्या उद्रेकाची वाट पाहत आहेत का ? सरकार म्हणून आपले काहीच कर्तव्य नाही का ? फक्त अमुकतमुक विषय रोज उभे करून टाळाटाळ करीत सत्तेचा उपयोग करीत आहेत का ? आजपर्यंत किती लोकांवर ईडी,सिबीआय ची कारवाई झाली आणि जेलमध्ये आहेत!शिक्षण, आरोग्य,अन्नदाता शेतकरी यावर काही आजपर्यंत उपाय योजना करण्यात आली का नाही? सरकारी शाळा बंद पडत आहेत आणि खाजगी शाळेत मनमानी कारभार चालू आहे ,तसेच आरोग्य चेही तिनतरा वाजले आहेत, खाजगी हाॅस्पिटल ची भरमसाठ बिले,औषधी दुकानाची बिले अमुक एकच औषध याच ठिकाणाहून आणा असा हाॅस्पिटल चा आग्रह, आणि जे पन्नास वर्ष आधीचे सरकारी हाॅस्पिटल आहेत त्यात पण सुविधां मिळत कठीणच झाले,शेतकरी हवालदिल आहे मग जनतेची होणारी अवहेलनाच नाही का ? आज ट्रॅफिकची डोकेदुखी रोजचीच ठरत आहे !
शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत तर काही ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे या रस्त्यावरून भिवंडीकरांना जाणे हलाखीचे झाले आहे. त्यातच खड्ड्याचा आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे शहराच्या चारही बाजुंना असलेल्या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे भिवंडीकरांच्या जीवाचे हाल सुरू आहेत...
या प्रमुख समस्यांकडे एकमेकांवर आरोप करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याने या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नोकरवर्ग,व्यापारी आणि प्रवासी वर्गाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.या वाहतूक कोंडी मुळे आता मेरी जान मुबंई, नवीमुंबई ,पुणे,नाशिक औद्योगिक क्षेत्रात आज हीच परिस्थीती त्यांच्यावर ओढावली आहे. कारखानदार , व्यावसायिक, कंपनीवाले हैराण झालेत एक तर महाराष्ट्रात भरमसाठ टॅक्स वसूल केले जाते आणि वेळेत मालाची देवाणघेवाण होत नाही याने आर्थिक नुकसान होत आहे. सर्व स्थरांतून भरमसाठ वाढ लाईट,पाणी, सरकारी कर यातून मुक्त होण्यासाठी परराज्यात अनेक कारखाने,कंपनी आपला पर्याय निवडून जात आहेत मग अमुकतमुक रोजगार कसा उपलब्ध होणार याचे उत्तर सरकारने द्यावे! मग नवीन स्मार्ट सीटी, औद्योगिकीकरण," सबका साथ सबका विश्वास " हवाई चप्पल वाला हवाई जहाज से सफर करणार का , आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण राबविण्यात सरकार ला रस नाही का ? मग फक्त श्रीमंत लोक आजून श्रीमंत होताना दिसत आहेत पण सामान्य जनता घर कर्ज, शाळेची फी, हाॅस्पिटल यामध्येच व्यस्त या काही तोडगा निघेल का ?
