मुसळधार पावसामुळे या भागातील शेतकरी सुखावला,
सोगाव -: अब्दुल सोगावकर : गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी आपल्या शेतामध्ये तयार झालेला राब काढून अंतिम लावणी करण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे... एकंदरीत येथील शेतकरी या पावसामुळे सध्या आनंदात आहे, मात्र शेतमजुरांचा तुटवडा व वाढलेली मजुरी तसेच नवीन पिढी शेती कामात हातभार लावत नसल्याने यामुळे शेती करणे परवडत नसल्याने नाईलाजास्तव आपल्याच कुटुंबातील सदस्यांना घेऊन शेती कामे करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे...
याभागात सध्या मजुरीचे दर हे पुरुषांना ५०० रुपये तर महिलांना ३०० ते ४०० रुपये इतका दर आकारला जात आहे, तसेच बैल नांगरणीसाठी एक हजार ते बाराशे रुपये दर आकारला जात आहे, यामध्ये ट्रॅक्टर व टिल्लरने नांगरणी करण्यासाठी प्रती तास बाराशे ते पंधराशे रुपये दर आकारला जात आहे... याशिवाय भातशेती लावण्यासाठी बियाणे व खते याचे दर हे गगनाला भिडले आहेत... वाढते प्रदूषण व लहरी हवामान या सर्व कारणांमुळे एकंदरीतच भातशेतीचे लागवड क्षेत्र कमी प्रमाणात होत आहे...
फोटो लाईन : मापगाव विभागात भातशेती लावताना शेतकरी व शेतमजूर,
