महाराष्ट्र वेदभुमी

भाऊ डिके, संज्योत पडवळ शेतकरी पुरस्काराने सन्मानीत, रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम

बापजाद्यांची शेती दौलत विकू नका, पुढची पिढी माफ करणार नाही ; ज्ञानेश्वर खुटवड

रोहा (प्रतिनिधी) गोपाळवट गावाचा परिसर सुंदर आहे, कष्ट करणारे प्रगतशील शेतकरी पाहून आनंद वाटला. कृतीशील शेतकरी भाऊ डिके यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान करण्याचा भाग्य लाभला. रायगड प्रेस क्लबचा हा स्तूत्य उपक्रम आहे. डिके यांचा शेताच्या बांधावर सन्मान करताना माझ्या वडिलांच्या कष्टाचा सन्मान केल्यासारखे वाटत आहे. जमिनीचा पोत सुधारला पाहिजेत. त्यासाठी शेती शिल्लक ठेवा, बापजाद्यांची शेती खरी दौलत आहे, शेती विकू नका, नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही, शेतकऱ्यांनी शेती योजनांचा लाभ घ्यावा असे मौलिक मार्गदर्शन वजा आवाहन प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी केले. कृतीशील शेतकरी भाऊ डिके यांचा सन्मान कार्यक्रमात शेताच्या बांधावर ते बोलत होते, तर शेतकरी कृषी पर्यटन ठिकाणी विविध खाद्य पदार्थांच्या माध्यमातून अधिक रोजगाराची निर्मिती करू शकतात, भौगोलिक स्थिती चांगली आहे, चुलीवरचे जेवण, कोरी चहा अनेक खेळीयाड कलात्मक उपक्रम राबवू शकतो, विविध प्रकारची मच्छी पदार्थ यातून पर्यटन परिपूर्ण करता येईल असे मौलिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ मनोज तलाठी यांनी प्रगतशील शेतकरी संज्योत पडवळ यांच्या रायगड प्रेस क्लब सन्मान कार्यक्रमात कुडली येथे आयोजित कार्यक्रमात केले. दरम्यान, गोपाळवट येथील प्रगत शेतकरी भाऊ डिके, कुडली येथील महिला आदर्श शेतकरी संज्योत पडवळ यांना रायगड प्रेस क्लबच्या शेताच्या बांधावर शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, तर शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान हा रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम असल्याचे गौरवद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले आहे...

रोहा प्रेस क्लब आयोजित रायगड प्रेस क्लबच्या शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान कार्यक्रमाचे गोपाळवट, कुडली येथील कार्यक्रमात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ मनोज तलाठी, अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सिटीझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, संघटक शशिकांत मोरे, दीपक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम, बिजामृतचे चेअरमन भारत पाटील, शेतकरी चंद्रकांत लोखंडे, अँड बापूसाहेब पडवळ, पत्रकार महेंद्र दुसार, डॉ चव्हाण, ग्रामसेविका पुजा रंगारी, यांसह प्रेस क्लबचे पदाधिकारी, कृषी सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी भाऊ डिके यांचा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व मान्यवरांच्या हस्ते रायगड प्रेस क्लब शेताच्या बांधावर पुरस्काराने सन्मानीत केले तर कुडली येथील कृषी पर्यटक शेतकरी संज्योत पडवळ दाम्पत्यांचा अ भा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ मनोज तलाठी, कृषी अधिकारी महादेव करे व मान्यवरांच्या हस्ते आदर्श शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला. भाऊ डिके यांनी कुक्कुट, खेकडा पालन, भाजीपाला, नाचणी व अन्य पिके घेऊन शेतीतला आदर्श अधोरेखीत केला. संज्योत पडवळ यांनी पपई लागवड, हळद, मस्य शेती, दुग्ध व्यवसाय यांसह कृषी पर्यटनात मोठी भरारी घेतली. दोन्ही शेतकऱ्यांचा कृतिशील शेतकरी म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी शेती विकू नका, हाती काहीच लागणार नाही. जैविक शेती तंत्रज्ञान स्विकारून शेतीचा पोत सुधारा, अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही असे वास्तव खुटवड यांनी मनोगत व्यक्त केले. कुडली येथील कार्यक्रमात कृषी अधिकारी महादेव करे, अनिकेत निकम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. शेतकरी संज्योत पडवळ ह्या शेती कृषी पर्यटन क्षेत्रात रोल मॉडल म्हणून पुढे येत आहेत, त्यांनी कृषी पर्यटन व्यवसायात कलात्मक व रुचकर पद्धतीने अधिक रोजगार शोधावा असे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ मनोज तलाठी यांनी मनोगतातून व्यक्त केले. शेतकरी, पत्रकार व शेती सबंधी क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन चर्चासत्रासारखे कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी सूचना मिलिंद अष्टीवकर यांनी केली. यावेळी राजेंद्र जाधव यांनी हा शेतकरी सन्मान उपक्रम एक चळवळ होऊ पाहत आहे, अशी अपेक्षा प्रास्ताविकात व्यक्त केली. सन्मान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post