पवनी बफर झोन परिसरातील पालोरानजीकची घटना
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- देवालपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपरिया गावातील युवक गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता. चेतन प्रदीप सोनटक्के (२१) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि.२९) सकाळी दहाच्या सुमारास पवनी वनक्षेत्र पालोरा नाजिकच्या जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवालापार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे कि, मृतक चेतन हा गेल्या काही दिवसांपासून वेेळसर सारखा करीत होता. त्याला कोणीतरी त्या मारहान करीत असल्याचे भास होत होते. त्यामुळे तो वारंवार इकडे तिकडे धावत होता अशी चर्चा गावात होती. तो मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास तो त्याच्या पिपरिया येथील घरून निघाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. तेव्हापासुन तो बेपत्ताच होता. शुक्रवारी (दि.२९) सकाळी १० च्या सुमाराच पवनी एकसंघ नियंत्रकचे कर्मचारी पेट्रोलींग करीत असतांना कक्ष क्र ५८४ मध्ये चेतनचा मृतदेह आढळून आला. तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यांची माहिती कुटुंबियांना दिली... घटनेची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे व वनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकुर आपापल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृतदेहाची उत्तरीय तपासनी करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पिपरिया येथे चेतनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे...