महाराष्ट्र वेदभुमी

नागरीकांना मिळणार आरो फिल्टरच्या शुद्ध पाण्याचा लाभ

मानापुर येथे जल शुद्धीकरण संयत्र तथा सी.सी.टी.व्ही. चे थाटात उद्घाटन

सरपंच संदीप सावरकर यांचे हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :-  तालुक्यातील रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत मानापुर येथे (आरो फिल्टर प्लांट) मुळे नागरीकांना पिण्याचे शुद्धपाणी मिळणार आहे. शुक्रवार (दि.२९) ऑगस्टला  सरपंच संदीप सावरकर यांचे हस्ते  जल शुद्धीकरण संयंत्र व सीसीटिव्ही कँमेर्‍यांचे थाटात उद्घाटन करण्यात झाले. याप्रसंगी प्रामुख्याने बिडिओ जयसिंग जाधव यांचेसह उपसरपंच भारत अडकणे व सदस्यगणांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेषतः पावसाळ्यामध्ये अशुद्ध पाणि तथा डासांच्या माध्यमातून विविध आजारांना पेव फुटत असतो. गट ग्रामपंचायत मानापुर चे सरपंच संदीप सावरकर यांनी ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोगाच्या निधितुन साडेचार लक्ष रुपयांच्या निधीची तरतुद करून डिगी मैदान परिसरात जल शुद्धीकरण संयंत्र उभारले तथा तेथे सीसीटीव्ही कॅमेराचे शुक्रवारी त्यांच्यात हस्ते उद्धाटन करण्यात आले. उद्घाटन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे हस्ते पार पडणार होता मात्र जयस्वाल यांना काही कामानिमित्य बाहेर जायचे होते त्यामुळे त्यांनी सकाळच्या सुमारास या प्लांट ला भेट देवुन ते निघुन गेले. त्यांच्या अनुपस्थितीत सरपंच संदीप सावरकर यांनी सदर प्लांट चे उद्घाटन करून ते लोकांसाठी खुले केले. याप्रसंगी सरपंच संदीप सावरकर, रामटेक पंचायत समितीचे बिडिओ जयसिंग जाधव, उपसरपंच भारत अडकणे, ग्रामपंचायत अधिकारी निवृत्ती नेवारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल वांढरे, आकाश चांदेकर तथा गावातील जेष्ठ नागरीक मुरलीधर आकरे, नत्थु चंदनकर, माधोजी नगरे, किशोर मोटघरे, शामु सोनवाने, इंद्रपाल मरई, उमेश मेश्राम, हिरामण आकरे, अनील नागपुरे, पद्माकर सावरकर यांचेसह गावातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...

अत्यल्प निधीत काम फत्ते केले - सरपंच सावरकर 

अपुऱ्या निधीत सदर काम पुर्ण करणे खुप कठीण होते. संपूर्ण बजेट दहा लक्ष रुपयांपर्यंत जात होता मात्र बुद्धीमत्ता व योग्य नियोजनामुळे ते फक्त साडेचार लक्ष रूपयात करणे शक्य झाले. आता परिसरातील नागरीकांना फक्त ५ रुपयांमध्ये शुद्ध पाणि उपलब्ध होणार आहे. विशेषतः मानापुर व भोजापुर तथा परीसरातील लोकांना येथील शुद्ध पाण्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्य सुदृढ राहील. त्याचप्रमाणे सी.सी.टी.व्ही. कॅमेरा मुळे परिसरातील अपराधिक गतीविधिंवर आळा बसेल असेही सरपंच संदीप सावरकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post