माणगाव :- (नरेश पाटील) गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीने साजरा केला जाणारा प्रमुख सण असून त्याची तयारी जोमात सुरू झाली आहे. बाजारपेठेत रंगीबेरंगी सजावटींच्या वस्तूंनी उत्सवी माहोल निर्माण केला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घर, मंडळे आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावटीचे साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.
रंगीबेरंगी लाइट्स, कृत्रिम फुले, तोरणे, रंगोळी साहित्य, सजावटीचे पेपर आयटम्स, थर्माकोलच्या आकर्षक मूर्ती-आकृती, सजावट वस्तू तसेच आधुनिक डिझाईनचे सजावटी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. शहरातील तसेच उपनगरातील व्यापारी गणेशभक्तांच्या मागणीनुसार विविध नवीन सजावटीच्या वस्तू बाजारात आणत आहेत...
यामुळे बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली असून ग्राहकांना आकर्षक साहित्य मिळावे म्हणून दुकानदारही स्पर्धा करत आहेत. सणानिमित्ताने बाजारपेठा गजबजून गेल्या असून वातावरणात उत्साह आणि आनंदाची लहर पसरली आहे.