सोगाव - अब्दुल सोगावकर :आगामी काळात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर मुनवली, सोगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत व इतर प्रकारची स्वच्छता मोहीम मापगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी हे आपल्या भागातील ग्रामस्थांच्या सुदृढ आरोग्यासाठी नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असल्याने त्यांनी ग्रामस्थांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, गल्लोगल्लीतील रस्त्यावर झालेले चिकट शेवाळ ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने काढणे, तसेच अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरणे, स्ट्रीट दिवे बसवणे व इतर सर्व प्रकारची स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून ग्रामस्थांना दिलासा दिला...
फोटो लाईन : सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी स्वच्छता मोहीम यशस्वी करताना,