अलिबाग - अब्दुल सोगावकर : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार 'दगडीचाल २' चित्रपट फेम योगेश पवार यांना नुकत्याच झालेल्या 'समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार २०२५' सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करुन सन्मानित करण्यात आले होते. बी.एस. बहुउद्देशीय संस्था, अमरावती, श्री. संत कबीर बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा आणि उपेक्षित नायक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी अमरावती येथील साई पॅलेस हॉटेलमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सोनवणे होत्या, तर कार्यक्रमाचे नियोजन 'ब्रँड सरदार' यांनी केले...
या सोहळ्याला अनेक 'रिल्स स्टार', कलाकार, दिग्दर्शक, मॉडेल, आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले विनोदी कलाकार योगेश पवार यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीने उपस्थितांची मने जिंकली. याच कार्यक्रमात 'बिहाली' या आगामी हिंदी चित्रपटाच्या तसेच शिर्डी येथे होणाऱ्या एका भव्य फॅशन शोच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले. कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन या सोहळ्याची शोभा वाढवली...
फोटो लाईन : अमरावती येथील समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित विनोदी कलाकार योगेश पवार व उपस्थित इतर मान्यवर,
