पोलीस अधिकारी रामटेक यांना सामूहिक निवेदन
तीन दिवसांत अटक करा, अंदोलनांचा इशारा
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करीत असणाऱ्या पत्रकाराला शासनातर्फे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी मात्र वर्तमानपत्रात बातमी का बरं छापली व त्यामुळे आमची बदनामी झाली म्हणून गैर अर्जदाराकडून वारंवार त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे... याबाबद पत्रकार सुरेंद्र बालचंद बिरणवार यांनी रितसर रामटेक पोलीस तक्रार दिलेली असुन सुद्धा आपल्या पोलीस प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही... त्यामुळे पत्रकार संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सामूहिक निवेदन दिले... कारवाई करण्याची मागणी केली...
पोलिस ठाणे हद्दीतील नगरधन येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या रामटेक शाखेचे सदस्य सुरेंद्र बालचंद बिरणवार यांनी ३ ऑगस्ट रोजी बातमी छापली... बातमी छापल्यामुळे आमची बदनामी झाली.' असे म्हणत आरोपी श्याम वाघमारे रा. नगरधन, ता. रामटेक, व नीलेश वाघमारे मु. हमलापुरी, ता. रामटेक यांच्याकडून वारंवार त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे पत्रकार बिरणवार यांनी रामटेक पोलिस स्टेशनला १० ऑगस्टला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे... गंभीर प्रकारचा गुन्हा असूनही पोलसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही... त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मीडिया रामटेकतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक यांना सोमवारी निवेदन दिले... पत्रकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३ नुसार तात्काळ गंभीर गुन्हा दाख्ल करून अटक करण्याची मागणी केली... तीन दिवसात आरोपीवर गुन्हा नोंद करून अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला...
ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
स्थानिक पोलिसांनी गैर अर्जदारांविरोधात अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही... उद्या मंगळवारी नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार यांची भेट घेऊन त्यांना तक्रार देणार आहे... किमान यामुळे कारवाईला वेग येईल... अशी माहिती जिल्ह्यातील पत्रकार संघटनांततर्फे देण्यात आली...
