जबलपूर महामार्गावरील पवनी परिसरातील घटना : दोघे गंभीर जखमी
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत... अपघातातील जखमींना देवलापार प्राथमिक आरोग्य रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेज हलविण्यात आले आहे... ही घटना मंगळवारी दि.०८ रोजी दुपारी ४ दरम्यान नागपूर जबलपूर महामार्ग पवनीजवळील महावितरण पावर हाऊससमोर हा अपघात घडला... विकास कुमार गौतम वय २५ राहणार लालपुर मध्य प्रदेश तर चेतराम परतेती वय २६ रा बोथिया पालोरा अशी जखमींची नावे आहेत...
विकासकुमार हा एमपी-२२/एमएन-२२९६ क्रमांकाच्या मोटारसायकलने एकटाच देवलापारहून नागपूरच्या दिशेने जात होता, तर चैतराम हा एकटाच क्रमांकाच्या एमएच झेड-३४०७ मोटारसायकलने मनसरहून देवलापारच्या दिशेने येत होता. पवनी (ता. रामटेक) गावाजवळ या दोन्ही मोटारसायकलींची आपसात जोरदार धडक झाली... यात दोघेही वाहनांसह खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले... अपघात होताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सूचना देत दोन्ही जखमींना देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले... तिथे प्रथमोपचार केल्यानंतर दोघांना नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे...
पोलिस कर्मचारी उर्मठ वर्तन
याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी रंजीत जाधव यांना याबाबत माहिती विचारण्याकरीया फोन केला असता त्यांनी पत्रकारांना उद्धटपणाची उत्तरे देत तुम्ही कोण ठाण्यात या पत्रकार काय व्ही आय पी झाले काय? मी फोनवर माहिती देणार नाही असे उद्धट उत्तर दिले... हा पोलीस कर्मचारी बातमीदारांशी असा वागतो तर सामान्य नागरीकाशी कसा वागत असेल अशी चर्चा बातमीदारात होती...
