महाराष्ट्र वेदभुमी

बोट बुडाल्याची घटना समोर; रायगडः जिल्ह्यातून मोठी दुर्दैवी घटना


रायगड - रायगड जिल्ह्यातून मोठी दुर्दैवी घटना समोर येत आहे.... खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही बोट आज सकाळी सात वाजेपासून समुद्रात मासेमारीसाठी गेली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. बोटीत एकूण 8 जण होती. बोट समुद्रात असताना ओहटीच्या लाटांमुळे उलटल्याची घटना घडली... या घटनेनंतर 5 जण बचावले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत... तर 3 जणांचा शोध अद्याप सुरु आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरु आहे... मात्र, मुसळधार पावसामुळे शोध मोहीमेत अडथळा येत असल्याची देखील माहिती आहे...

Post a Comment

Previous Post Next Post