कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार हे छोटस गाव. गाव तसं छोटसंच, परंतु ग्रामदेवतेच्या कृपाशिर्वादाने ग्रामस्थांची अर्थातच गावाची भरभराट झाली आहे... जसखार गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवी म्हणजेच आगरी कोळ्यांचं भक्ती शक्तीचं माहेरघर.श्री रत्नेश्वरी देवीच्या अगाध महिमेची भक्तगणांना आलेली प्रचिती. यामुळेच देवीची किर्ती साऱ्या पंचक्रोशीत गाजत आहे... गावात नव्याने बांधण्यात आलेल्या देवीच्या आखिव, नक्षिकलेचा उत्तम नमुना असलेले, आकर्षक, सुंदर, संगमरवरी दगडात बांधलेल्या मंदिरात देवी वसलेली आहे... जसखार गावासाठी मंगळवार म्हणजे देवीचा वार. रत्नेश्वरी आईचा वार.या दिवशी गावातील भक्तजन उपवास पकडतात... गावातील तसेच बाहेर गावातील देवीचे भक्तगण मंदिरास भेट देऊन, देवीची मनोभावे पूजा-आरती करतात... मंदिर उत्सव समितीतर्फे परंपरेनुसार दर मंगळवारी सायंकाळी ठिक ०७:०० वाजता देवीची मनोभावे आरती केली जाते...या आरतीला गावातील भक्तजण मोठ्या संख्येने उपस्थित असतात...
रत्नासारखे लखलखीत रुप असलेली श्री रत्नेश्वरी देवीची यात्रा-पालखी उत्सव म्हणजेच एक मोठा सण. चैत्र कालाष्टमीच्या सुवर्णमयी दिवशी गावची आराध्य देवता नवसाला पावणारी श्री रत्नेश्वरी देवीचा यात्रा-पालखी सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात येतो... सुमारे १५० वर्षांची परंपरा असणारी देवीची यात्रा-पालखी गुण्यागोविंदाने साजरा होत आहे...
