कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे उरण तालुक्यातील चिरनेर गाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले... या परिसरात आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे प्राबल्य होते आणि बहुसंख्य ग्रामस्थांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय होता... इंग्रजांनी २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर, कळंबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावातील गावकऱ्यांना जंगलातील लाकडे तोडण्यास मनाई केली... गावकऱ्यांनी काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळे इ. विविध अवजारे घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला... सत्याग्रहात सामील होण्यासाठी अनेक ग्रामस्थ रस्त्यावर आले... महात्मा गांधीनी सुरु केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला पाठींबा देण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची तमा न बाळगता सत्याग्रह करून इंग्रजांचा रोष ओढून घेतला...
इंग्रजांनी केलेल्या गोळीबार आणि लाठीहल्ल्यामुळे अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, तर काहींना कायमचे अपंगत्व आले... या सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे) हे सत्याग्रही हुतात्मा झाले... या जंगल सत्याग्रहाला चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणून ओळखले जाते...
लेख – पत्रकार कांतीलाल पाटील- जासई (उरण)
